असीरगड किल्ला गुढ रहस्यांनी आजही चर्चेत
असा अहेर नावाच्या शासकाने 1370 मध्ये बनवला किल्ला : भारतातील सर्वाधिक पुरातन किल्ला
रावेर (शालिक महाजन) : रावेरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील असीरगड किल्या अनेक युध्दांचा साक्षीदार तसेच दख्खनचा दरवाजा तर महाभारताच्या गूढ रहस्यामुळे चांगलाच गाजत आहे. यामुळे किल्ल्याला भेट देणार्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
अहेर शासकाने बनवला किल्ला
सातपुडा पर्वत रांगामध्ये लांबुनच दिसणारा हा किल्ला इ.स. 1370 मध्ये असा अहेर नावाच्या शासकाने बसविला होता. असीरगड किल्ला भारतातील सर्वात पुरातन किल्यांपैकी एक मानला जातो. असीरगड किल्याला गेट वे तुडवे म्हणजे ‘दख्खन का दरवाजा’ सुध्दा म्हणतात. ज्या कोणी शासकांनी या किल्ल्यावर एक वेळा आपला कब्जा केला त्यांना दक्षिण विजयाचे द्वार सहज घडले जात होते. यासह देश-विदेशाच्या व्यापार्यांशी येथून सहज व्यापार करून आपल्या राज्याची आर्थिक पकडदेखील मजबूत करता येत असे. सुमारे दोनशे वर्ष हा किल्ला फारुखी शासकांकडे होता. त्यानंतर मोगल बादशाह अकबर यांनी हा किल्ला जिंकला. सांगितले जाते की, बादशाह अकबर यांना असीरगड किल्ला जिंकायला तब्बल सहा महिने युध्द करावे लागले होते.त्यानंतर असीरगड किल्यावरील रसद संपल्याने अखेर बहादुरखान यांनी हा किल्ला बादशहा अकबर यांना दिला होता हा किल्ला जिंकल्यमुळे काही दिवस बादशहा अकबर याच असीरगड किल्यात थांबले होते.
दख्खनचा दरवाजाची ओळख
उत्तर भारतात मुगलांचे सम्राज्य होते. दक्षिणेत कुतुबशहा तर उत्तरेस आदिलशहांचे सम्राज्य होते तर मध्य महाराष्ट्रात मराठे होते. उत्तर भारतावर आपला वचक ठेवण्यासाठी या असीरगड किल्ल्यावर विजय मिळविणे आवश्यक, असे खान्देशची राजधानी म्हणून सुध्दा असीरगड किल्ला होता.
मुगल, मराठा, पेशवे व इंग्रजांचा होता रहिवास
असा अहेर नावाच्या शासकाने बसवलेल्या असीरगडमध्ये अनेक गुप्त रस्ते आकर्षित पायाभरणीत बनवले तर तर जमिनी अंतर्गत भूल-भुलैया बनविण्यात प्रकारातील रस्ते आहेत. समुद्र स्तरापासून सुमारे 750 फूट उंची वर असलेल्या या किल्ल्यावर एक प्रसिध्द मशिद तर पुरातन शिवाचे मंदिर आहे. याच शिव मंदिरात महाभारतातील श्रापीत अश्वत्थामा दररोज येथे येऊन गुलाबाचे फूल शिवपिंडावर चढवून अभिषेक करीत असल्याचे बोलले जाते. असीरगड किल्ल्याने मुगल, मराठा, पेशवे व इंग्रज आदीनी जिंकून येथे रहिवास केल्याचा इतिहास आहे.
असीरगड किल्ल्याचा असा आहे इतिहास
इ.स.1600 ते 1758 मध्ये मुगलांच्या ताब्यात खान्देशची राजधानी म्हणून सेवेत होता परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा भेटीच्या वेळी मोगल बादशाह औरंगजेब यांच्या आदेशावरुन महाराज बादशाहच्या भेटी आले म्हणून मोगल मुलखात पहिले स्वागताचे पत्र येथेच मिळाले होते. त्यानंतर इ.स.1760 मध्ये हा किल्ला मराठ्यानी जिंकला. त्यानंतर इ.स. 1821 मध्ये हा किल्ला पेशव्यांकडे गेला तर 1869 हा साली किल्ला इंग्रजांकडे होता.
अश्वत्थामा करतात पूजा
महाभारताच्या युध्दा नंतर आचार्य द्रोणाचार्य यांचा पुत्र चिरंजीवी अश्वत्थामा याला श्रीकृष्ण यांनी युगो-युगो पर्यंत भटकण्याचा श्राप दिला होता. आजही अश्वत्थामा सकाळच्या पहारात येथे येतात व शिवपिंडाची दररोज पूजा करून पुष्प अर्पण करतात, किल्याच्या पायथ्याशी असणार्यांनी अनेकांनी अश्वत्थामा यांना पाहिले असून दिसणार्या प्रत्येक व्यक्तीला ते भाकर आणि दूध मागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. असीरगड किल्ल्याला मोठा इतिहास लाभल्याने हा किल्ला मध्य प्रदेश सह महाराष्ट्रात देखील चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे हा किल्ला बघण्याची भाविकांची मोठी उत्सुकता असते.

