दीपनगरातील संजय बर्‍हाटे मृत्यूप्रकरणाची चौकशी करा


भुसावळात निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्करांची मागणी

भुसावळ : तालुक्यातील दीपनगर विद्युत प्रकल्पात 2 फेब्रुवारी 2020 रोजी सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत संजय बळीराम बर्‍हाटे यांचा मृत्यू ओढवला होता मात्र पोलिसांवर दडपण टाकून गुन्हा दाखल करण्यात आला शिवाय काहींचा या गुन्ह्यांशी संबंध नसतानाही त्यांचे नाव या गुन्ह्यात गोवण्यात येत असल्याचा आरोप निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी भुसावळातील शासकीय विश्रामगृहात आयाजित पत्रकार परीषदेत करीत पोलिसांनी या प्रकरणाची निप्षक्षपणाने चौकशी करावी, अशी मागणी शनिवारी केली. ते म्हणाले की, योगेश नावाचा सुरक्षा रक्षकच प्रकल्पात नसताना संशयीत सागर मोरे यांचा भाऊ योगेश या गुन्ह्याशी संबंध जोडला जात आहे.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी निळे निशाण सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत गाढे, विजय धनगर, शहराध्यक्ष महेंद्र महाले, तालुका सरचिटणीस सुकदेव सोनवणे, तालुकाध्यक्ष आकाश सपकाळे, संपर्क प्रमुख दीपक लोहार, यावल अध्यक्ष संतोष गुप्ता यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सतत्या तपासून व्हावी कारवाई
आनंद बाविस्कर म्हणाले की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावेत शिवाय किती सुरक्षा रक्षक घटना घडली तेव्हा उपस्थित होते याची माहितीदेखील घ्यावी, असेही ते म्हणाले.210 मेगावॅटच्या मेनगेटवरुन बेकायदेशीररीत्या पॉवर हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारे संजय बर्‍हाटे, पियुष बर्‍हाटे, निखील बर्‍हाटे यांचा आत जाण्याचा उद्देश काय याचीही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी तसेच पियुष बर्‍हाटे यांनी दिलीप बर्‍हाटे यांना दिलेल्या माहितीनुसार संजय बर्‍हाटे यांना मारहाण करणार्‍या सुरक्षा रक्षकांपैकी सागर मोरे या सुरक्षा रक्षकाने फोन करुन राजेश बनसोडे व योगेश या सुरक्षा रक्षकांना घटनास्थळी बोलावून घेतले. ते घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या ड्रेसवर नावाची नेमप्लेट नसताना त्यांनी सुध्दा संजय बर्‍हाटे यांना मारहाण केली, अशी माहिती पियुष बर्‍हाटे यांनी दिल्यामुळे दिलीप बर्‍हाटे यांनी पोलिसांना फिर्याद दिली असल्याचे ते म्हणाले.

संशयीताच्या भावाचा संबंध नाही
मयत बर्‍हाटे यांच्या मारहाण प्रकरणात विद्युत केंद्राचे सुरक्षा रक्षक संजय लोकरे, सागर मोरे, राजेश बनसोडे या सुरक्षा रक्षक यांना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. योगेश नावाच्या सुरक्षारक्षक याचा शोध तालुका पोलिस प्रशासन घेत आहेत मात्र आरोपी सागर मोरे याचा भाऊ योगेश याचा घडलेल्या घटनेशी काही एक संबंध नाही. तो कुठल्याही सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत नाही. योगेश हा सीएचपी मेगावॅट या प्लॅटमध्ये कार्यरत असून 3 फेब्रुवारी रोजी रात्री कुठल्याही 210 किंवा 500 या प्लँटमध्ये उपस्थित नसून तो घरी होता. तीरीही त्यास संशयीत म्हणून तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी ठाण्यात बोलावून चौकशी करण्याचा उद्देश काय? याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, असे संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी सांगितले. न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !