यावलमधील विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू


यावल : शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने शहरातील बोरावल गेट भागातील साने गुरूजी शाळेजवळील रहिवासी संध्या अनिल फेगडे (45) यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली. फेगडे या शनिवारी पाटचारी जवळील आपल्या शेतात गवारच्या शेंगा तोडण्यास गेल्या असताना 12.3.0 वाजता त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला सर्पदंश झाला व लागलीच त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, अधिपरीचारीका नेपाली भोळे आदींनी उपचार केले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचार्थ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गोदावरी रुग्णालयात हलवताना रस्त्यातच त्यांचे निधन झाले. फेगडे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !