भुसावळात हाणामारी : पसार आरोपी वर्षभरानंतर जाळ्यात
भुसावळ : किरकोळ कारणावरून वाद घालत एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना शहरातील जुन्या तालुका पोलिस ठाण्याजवळील भाजी मार्केटमध्ये 14 ऑक्टोबर 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी पसार झालाहोता. आरोपी पंचशील नगरात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तब्बल 13 महिने 14 दिवसानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. नागेश बाळु सोनवणे (23, रा.पंचशील नगर, शर्मा हॉस्पिटलजवळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
14 ऑक्टोबर 19 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तक्रारदार पवन उर्फ प्रवीण रवींद्र येवले (24, रा.पंचशील नगर, भुसावळ) यांच्यावर नागेश बाळू सोनवणे (23, रा.पंचशील नगर) या आरोपीने शिवीगाळ करीत पोटावर चाकू मारून दुखापत केली होती. गुन्हा घडल्यानंतर आरोपी पसार झाला होता. आरोपी शनिवारी शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.फौजदार ग्ययासोद्दीन शेख, कृष्णा देशमुख, तस्लीम पठाण, वाल्मीक सोनवणे, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, सचिन चौधरी, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे, योगेश माळी आदींनी ही कारवाई केली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.

