जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 23 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 54 हजार 525 वर : आतापर्यंत 52 हजार 677 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1297 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 54 हजार 525 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 52 हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 297 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 35 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून गेल्या 24 तासात यावल तालुक्यातील 86 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 14
जळगाव ग्रामीण 02
भुसावळ 03
अमळनेर 00
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 01
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 00
चाळीसगाव 00
मुक्ताईनगर 00
बोदवड 01
अन्य जिल्हा 02

