भुसावळात सोशल डिस्टन्सचे पालन करीत पार पडला आदर्श विवाह


भुसावळ : अनाठायी खर्चाला फाटा देत भुसावळात आदर्श विवाह सोहळा नुकताच पार पडला. कोरोनामुळे अवघ्या 50 मंडळींच्या उपस्थितीत विवाहाला परवानगी देण्यात आली असून मंडप, रोशनाई, डीजे तसेच बँड वाजा आदी बाबींना फाटा देत बौद्ध धम्माला अनुसरुन विलास कडू इंगळे यांचे चिरंजीव अर्पण (मनुर खुर्द, ह.मु.मुंबई) व गौतम मारुती तायडे (कपिलनगर, वरणगाव) यांची कन्या प्रियांकाचा आदर्श विवाह सोहळा बौद्ध रीतीरिवाजा प्रमाणे तक्षशिला नगर, भुसावळ येथील बुद्ध विहारात पार पडला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष बौद्धाचार्य शैलेंद्र जाधव यांनी त्रिशरण पंचशील व मंगल अष्टगाथा घेऊन विवाह सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गौरव कापडणे व विश्वगामी पत्रकार संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश दांडगे, विशाल बनसोडे यांची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !