भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर सुरू ठेवा


शिशिर जावळे यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

भुसावळ : भारतासह महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णाची संख्या व कोरोना रुग्णांचा मृत्यू दर यात झपाट्याने वाढ होत आहे. भुसावळ तालुका शहर आणि परीसरासाठी शासनाकडून निर्गमित काही असणारे कोविड सेंटर बंद करण्यात आले असून फक्त भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटरमध्ये कोविड रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र 30 पासून या रुग्णालयातील कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने या ठिकाणी असणार्‍या कोविड रुग्णांना भुसावळ शहरापासून दूर असणार्‍या जळगाव तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. हा प्रकार म्हणजे रुग्णांची हेळसांड असून भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर कोणाच्या वाढता प्रादुर्भाव व धोका लक्षात घेता मधील कोविड सेंटर बंद करू नये, अशी मागणी प्रधानमंत्री जन कल्याण योजना प्रचार व प्रसार अभियान तथा राष्ट्रीय संत सुरक्षा परीरषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशीर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तथा जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !