कोरोनामुळे भुसावळात शीख बांधवांकडून शोभायात्रा रद्द
गुरूद्वारामध्ये गुरुग्रंथ साहिब पाठ वाचन, सत्संग, लंगर आदी कार्यक्रमांचे सोशल डिस्टन्स पाळून आयोजन
भुसावळ : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळात गुरूनानक जयंतीनिमित्त निघणारी शोभायात्रा रद्द करण्यात आली तर गुरूद्वारामध्ये यंदा केवळ गुरुग्रंथसाहिब पाठ वाचन, सत्संग, लंगर आदी कार्यक्रमांचे सोशल डिस्टन्सचे पालन करून आयोजन करण्यात आले. यंदा कोरोनामुळे नानक जयंतीनिमित्त होणारे भव्य स्वरुपातील गतकापार्टी आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
भुसावळात शोभायात्रा केली रद्द
शीख धर्मीयांचे पहिले धर्मगुरु श्री गुरुनानक देवजी यांच्या 551 वी जयंती उत्सव शीख धर्मियांकडून प्रकाशपर्व म्हणून साजरा करण्यात आला. श्री गुरुनानक यांच्या जयंती उत्सव भुसावळातील शीख बांधवांकडून साजरा केला जातो. दरवर्षी पूर्वसंख्येला नगरकीर्तन अर्थात शोभायात्रा काढली जाते यंदा मात्र रविवारी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही शोभायात्रा रद्द करण्यात आली तर सोमवारी श्री. गुरुनानक जयंतीनिमित्त आयोजीत प्रकाशपर्वांत गर्दी टाळून कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील जळगाव रोडवरील दशमेश मार्गावरील गुरुव्दारात सकाळपासून धार्मिक कार्यक्रम झाले. यात संत्संग, अखंड श्री. गुरुग्रंथसाहिब पारायण वाचन समाप्ती, श्री. गुरुग्रंथसाहिब दर्शन व लंगर सोहळा पार पडला.
फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत
परंपरेनुसार कथा, कीर्तन, आरती, दीपमाला, पुष्प वर्षाव, आतषबाजी आदी कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले होते मात्र यंदा कोरेानामुळे व्यापक प्रमाणात होणारे हे कार्यक्रम कमी गर्दीत व फिजीकल डिस्टन्स राखत पार पडले. यावेळी शहरातील सर्व शीख बांधवांनी सहभाग नोंदवला. सायंकाळी जळगावरोडवरील दशमेश मार्गावरील गुरुव्दारात फटाक्यांची आतषबाजीने स्वागत करण्यात आली. या निमित्ताने गुरुव्दारावर भव्य विद्यूत रोषणाई करण्यात आली. श्री गुरुनानक जन्मोत्सवात समिती व समाजबांधवांनी सहकार्य केले. जयंती उत्सवात पंजाबमधून गतका पार्टीच्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांचे सादरीकरण होते मात्र मिरवणूकच नसल्याने गतका पार्टीची रंगतही दिसून आली नाही.

