प्रलंबित घरकुलांची कामे तत्काळ पूर्ण करा : बीडीओ दीपाली कोतवाल


रावेर : तालुक्यातील विविध योजनेचे प्रलंबित घरकुल पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी ग्रामसेवकांची बैठक घेतली व. प्रलंबित घरकुले येत्या काही दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील जनतेनेदेखील सहकार्य करून प्रलंबित घरकुलांचे बांधकाम करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. रावेर पंचायत समिती येत्या शंभर दिवसात सर्व प्रलंबित घरकुल योजनेवर काम करणार असून या संदर्भात मंगळवकारी दिवसभर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परीषद गटनिहाय ग्राम सेवकांच्या बैठका घेतल्या.

या विषयावर गाजली बैठक
रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात भूमीहिन लोकांना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांना शंभर टक्के मंजुरी देणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिक दृष्टयापूर्ण करणे, डेमो हाऊस उभारने, नाविण्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करणे, कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थींना आधार लिंकिंग करणे यासह अनेक विषयावर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !