p>

लग्नाच्या आमिषातून जळगावातील अल्पवयीन तरुणीला पळवले


जळगाव- लग्नाचे आमिष दाखवून शहरातील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेलयाप्रकरणी रामानंदनगर पोलिसात सागर उर्फ निहाल संजय शिंदे या संशयीतोविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन तरुणी गर्भवती असल्याची बाब उघड झाली आहे. आई, वडीलांचा घटस्फोट झाल्याने पिडीती वडीलांजवळ समतानगरात राहते. पिडीतेला तिची आई भेटण्यासाठी आल्यानंतर मुलगी न दिसल्याने मुलीच्या वडीलांना विचारणा केल्यानंतर त्यांनी मुलगी काही दिवसांपासून घरी आली नसल्याची माहिती दिली. यानंतर पिडीतेच्या आईने शोध घेतला असता, 7 रोजी मुलगी सागर उर्फ निहाल संजय शिंदे याच्याकडे असल्याचे उघड झाले.

आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
सागर शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळविले व तिच्या सोबत शारीरीक संबंध ठेवल्याने मुलगी गर्भवती असल्याची तक्रार पीडीतेच्या आईने रामानंद नगर पोलिसात दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.