सातार्यात पाच शिवशाही बसेस पेटल्या : कोट्यवधींचे नुकसान
सातारा : सातारा बससस्थानकामध्ये शिवशाहीच्या पाच बस उभ्या असतानाच अचानक एका बसला लागलेल्या आगीचा विळखा पसरल्यानंतर अन्य चार बसेसही पेटल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आली मात्र आगीचा विळखा इतका होता की पाचही बसेसला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी ही आग कशी लागली यासाठी आजूबाजूचे हॉटेल आणि प्रवाशांकडे चौकशी सुरू केली आहे.