नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या वेळेत बदल
भुसावळ : रेल्वे प्रशासनाकडून नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा वेळेत बदल नागपूर ते नाशिक दरम्यान असणार आहे. शुक्रवार 19 पासून हा बदल करण्यात आला आहे. अप 01235 नागपूर-मडगाव विशेष गाडी नागपूरला 3.50 वाजता, वर्धा 4.48, बडनेरा 6.25, अकोला 7.30, भुसावळ 9.30, नासिक 01.20 वाजता पोहोचणार असून बदलाची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

