सहाय्यक निरीक्षकाची पोलिस ठाण्यात गोळी झाडून आत्महत्या


मुंबई : सहाय्यक निरीक्षकाने स्वतःच्या सर्व्हिस रीव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना एपीएमसी पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी 11.30 वाजता घउली. भूषण पवार असे आत्महत्या करणार्‍या सहाय्यक निरीक्षकाचे नाव आहे.
भूषण पवार यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळं आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

माणसिक तणावातून पाऊल उचचल्याचा अंदाज
भूषण पवार यांनी रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर कक्षात बसले असतानाच त्यांनी सर्व्हिस रीव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली. अचानक झालेल्या गोळीबाराने कर्मचारी हादरले व त्यांनी पवार यांच्या कक्षात धाव घेतली असता घटना समोर आली. गेल्या काही दिवसांपासून भूषण पवार हे मानसिक तणावात असल्याची माहिती समोर येत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !