ग्राहकांना दिलासा : खासदार अनलिमिटेडमध्ये जेवणाच्या बिलात 10 टक्के सुट


जळगाव : शहरातील पिंप्राळा रोडवरील भोईटे नगराील चोखंदळ ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या खासदार अनलिमिटेडमध्ये रविवार, 14 ोजी येणार्‍या ग्राहकांना जेवणाच्या बिलात दहा टक्के सुट दिली जाणार आहे. विसपुते परीवारातील सदस्य ‘निधी’ चा 14 रोजी स्मृतीदिनानिमित्त ही सुट देण्यात आली आहे.

निधी आजही स्मरणात
या संदर्भात माहिती देताना सूर्यकांत विसपुते व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली विसपुते म्हणाल्या की, आमच्या परीवारातील कायम स्मरणात राहणार्‍या लाडक्या ‘निधी’चा आज वाढदिवस. 14 फेब्रुवारीचा दिवस म्हणजे प्रेमाचा संदेश प्रत्येकाच्या मनात फुलविणारा दिवस व याच दिवशी निधीचाही वाढदिवस ! निधी आमच्या कुटुंबात आली आणि सर्वांना चटका लावून कायमची निघून गेली. निधी जरी आमच्यात नसली तरी आज आमची ओळख निधीमुळेच आहे. केवळ जळगाव शहरात, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आम्हाला निधीवाले म्हणून ओळखले जातो.निधी फाउंडेशन आणि निधी इंटरप्रायजेसच्या माध्यमातून आम्ही करत असलेले कार्य प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. निधी फाउंडेशन मासिक पाळी या विषयावर कार्य करीत असून ‘मासिक पाळी कापड मुक्त अभियान’ अंतर्गत गाव दत्तक घेतले जात आहे. मासिक पाळी विषयी जनजागृती करण्यासाठी हाती घेतलेले कार्य हे ‘निधी’मुळेच मिळालेली प्रेरणा आहे. ‘निधी’सारखी मुलगी आज आपल्या आयुष्यात असती तर तिच्यासाठी जे जे कर्तव्य पार पाडता आले असते तेच इतर मुलींमध्ये निधी म्हणून पार पाडले जात आहे. मासिक पाळी आणि स्वतःची स्वच्छता याविषयी मुलींना जागरूक केले जात आहे. निधी इंटरप्रायझेसच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला सारत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन शाळा, शासकीय कार्यालय या ठिकाणी बसविण्यात येत आहे. विसपुते परीवाराची ‘निधी’ सदस्य होती, आहे आणि कायम राहणार.. कारण आज हजारो मुलींच्या आयुष्यात निधीच्या माध्यमातून एक निधीचे आयुष्य जपलं जात आहे.









ग्राहकांना दहा टक्के जेवणाच्या बिलात सुट
रविवार, 14 रोजी निधीच्या वाढदिवसनिमित्त खासदार अनलिमिटेडला येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला देखील 10 टक्के सूट दिली जाणार असून ग्राहकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विसपुते परीवारातर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !