पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने 15 मजूर ठार


जळगाव : अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने 15 मजूर ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले .हा अपघात यावल तालुक्यातील किनगाव येथे मध्यरात्री नंतर घडला. धुळे जिल्या येथून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाला. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटला. यातील 15 मजूर जागीच ठार झाले. या ट्रकमध्ये एकूण एकवीस मजूर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. मृत व जखमी मजुरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील आभोडा येथिल असल्याचे सांगण्यात आले .मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

यांचा झाला मृत्यू

१) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार (वय ३०) रा.फकीर वाडा रावेर
२) सरफराज कासम तडवी (वय ३२) रा.के-हाळा ता.रावेर
३) नरेंद्र वामन वाघ (वय २५) रा.आभोडा ता.रावेर
४) डिगंबर माधव सपकाळे (वय ५५) रा. रावेर
५) दिलदार हुसेन तडवी (वय २०) रा. आभोडा ता.रावेर
६) संदीप युवराज भालेराव (वय २५) रा. विवरा ता. रावेर
७) अशोक जगन वाघ (वय ४०) रा. आभोडा ता. रावेर
८) दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) रा. आभोडा ता. रावेर
९) गणेश रमेश मोरे (वय ०५) रा. आभोडा ता. रावेर
१०) शारदा रमेश मोरे (वय १५) रा. आभोडा ता. रावेर
११) सागर अशोक वाघ (वय ०३) रा. आभोडा ता. रावेर
१२) संगीता अशोक वाघ (वय ३५) रा. आभोडा ता. रावेर
१३) सुमनबाई शालीक इंगळे (वय ४५) रा. आभोडा ता. रावेर
१४) कमलबाई रमेश मोरे (वय ४५) रा. आभोडा ता. रावेर
१५) सबनुर हुसेन तडवी (वय ५३) रा. आभोडा ता. रावेर



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !