कोरोना झाला मात्र ईडीच्या तारखा पाहून नव्हे !
माजी मंत्री गिरीश महाजनांचा खडसेंचे नाव न घेता टोला
जळगाव : गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटी बाबत मला काही माहित नाही. गेले तीन आठवड्यांपासून कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. मी आजच जळगावात आलो आहे. त्यामुळे मला याबद्दल काही माहित नाही मात्र मला ईडीच्या तारखा पाहून कोरोना झालेला नाही. माझ्यासह माझ्या घरातील सर्वच कुटूंब कोरोनाबाधीत होते आणि सर्व शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारीच माझी चाचणी निगेटीव्ह आल्याचा टोला माजी मंत्री खडसेंचे नाव न घेता माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे लगावला. माजी मंत्री तथा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी मंगळवारी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महिला रुग्णालयाची पाहणी केली असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली
माजी मंत्री महाजन म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. पोलिस यंत्रणचे मॅारल डाऊन झाले आहे. जळगाव महापालिकेतील शिवसेनेने संधी साधून मोठी घोडेबाजारी केली. सत्ता आपली असून तुम्हाला काही होवू देणार नाही, असे सांगून भाजपचे नगरसेवक त्यांनी फोडले. ठिक आहे आता पुढे या नगरसेवकांचे काय करायचे ते बघू, पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई कशी करायची ती आम्ही बघू, असा सूचक इशारा गिरीश महाजन दिला. शेतकर्यांसाठी आंदोलन करणार्या आमदार मंगेश चव्हाण यांना झालेल्या अटकेबाबत त्यांनी आश्चर्य व संताप व्यक्त केला.

