दिलासा : जळगावात मिळणार अवघ्या 749 रुपयात रेमडेसीव्हर इंजेक्शन


रेमडेसिव्हरचा काळाबाजार रोखण्यासाठी मुस्लिम मणियार बिरादरीचा पुढाकार : गरीब रुग्णांसाठी बिरादरीतर्फे मोफत रेमडेसीव्हर

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर अकोला येथील दत्त मेडिकल जर 750 रूपयांना इंजेक्शन देत असेल तर जळगावला का मिळू शकत नाही ? हा विषय चर्चिला जात असल्याची दखल घेत जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन सर्वप्रथम 1050/ रुपयात उपलब्ध करून दिले होत होते तर जळगावातील आपल्या मित्र परिवार व मुंबई येथील मित्र परीवार यांच्या सहकार्याने जळगावात रेमडेसिव्हर इंजेक्शन अवघ्या 749/- रुपयात उपलब्ध करून दिल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मंगळवारी सदरचे इंजेक्शन जळगावातल्या के.परवीन मेडिकल स्टोरमध्ये विक्रीला उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे इंजेक्शन घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये कुपण व कोरोना चाचणीचा अहवाल तसेच आधार कार्ड देणे गरजेचे आहे.

गरीबांना मोफत इंजेक्शन
फारूक शेख यांच्या माहितीनुसार, जे रुग्ण अगदी गरीब आहे मात्र त्यांन रेमडेसिव्हरचा खर्च पेलणे अशक्य आहे अशांना संपूर्ण 6 इंजेक्शनन मोफत देण्यात येणार आहे.

सिटी स्कॅन व रक्त तपासणीसाठी विशेष सूट
बिरादरीने यापूर्वी एच.आर.सिटी तपासणी सुद्धा फक्त 1800/- रुपयात व सम्पूर्ण कोविड रक्त तपासणी फक्त 1300/- रुपयात उपलब्ध करून दिली आहे. जळगाव मुस्लिम मणियार बिरादरीच्या कोविड रुग्णांसाठी महाराष्ट्रात जळगाव मणियार पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे. अधिक माहिती साठी संपर्कासाठी 9423185786 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.