पुणे-रावेर बसला अजिंठा घाटात अपघात : सहा प्रवासी जखमी


Pune-Raver bus derailed at Ajantha Ghat : Six passengers injured जळगाव :  66 प्रवाशांना घेऊन जाणारी पुणे-रावेर बस अजिंठा घाटात उलटली. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात 6 ते 8 प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भरधाव बस उलटली
रावेर आगारातील बस क्रमांक (एम.एच.40 वाय.5197) ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत असताना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात बस पलटी झाली. समोरून मालवाहू टेम्पो क्रमांक (एम.एच.20 जी.सी.7840) ला दुसरी बस ही तिच्या मागून ओव्हर टेक करत होती व यावेळी पुणे-रावेर बसवरील चालकाचे बसवरील ताबा सुटला त्यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जावून सात फूट खाली जावून उलटली



या बसमध्ये एकुण 66 प्रवाशी होते. त्यापैकी सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघातानंतर अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !