अरे देवा ! : पुन्हा कोरोनामुळे 14 रुग्णांचा मृत्यू : जिल्ह्यात 1191 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 87 हजार 879 वर : एकाच दिवसात 929 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 1191 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1611 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 87 हजार 879 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 74 हजार 594 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 929 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावसह भुसावळ व चोपडा शहरातील बाधीतांचे प्रमाण वाढले आहे.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 171
जळगाव ग्रामीण 47
भुसावळ 193
अमळनेर 120
चोपडा 233
पाचोरा 41
भडगाव 48
धरणगाव 48
यावल 24
एरंडोल 65
जामनेर 46
रावेर 26
पारोळा 20
चाळीसगाव 56
मुक्ताईनगर 31
बोदवड 20
अन्य जिल्हा 02

24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 63, 86 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा

एरंडोल तालुक्यातील 45, 67 व 75 वर्षीय महिलेचा

धरणगाव तालुक्यातील 37, 52 व 80 वर्षीय पुरूषाचा

पारोळा तालुक्यातील 80 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा

यावल तालुक्यातील 50 वर्षीय पुरूषाचा

जामनेर तालुक्यातील 56 वर्षीय पुरूषाचा

बोदवड तालुक्यातील 70 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.


कॉपी करू नका.