महापालिकेची सत्ता गेल्यानेच गिरीश महाजन अस्वस्थ


जळगाव : महानगरपालिकेची सत्ता भाजपाच्या हातातून गेल्याने माजी मंत्री गिरीश महाजन अस्वस्थ झाले आहे. आपल्याला कोरोना झाल्याची नौटंकी निश्‍चितच जमत नाही कारण त्याचा काय त्रास होतो याची मला पूर्णपणे जाणीव असल्याचा टोला माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे. ईडीच्या तारखा आल्यानंतर खडसेंना कोरोना होतो, असा टोला काल माजी मंत्री महाजनांनी लगावला होता. या पार्श्‍वभूमीवर एका चॅनलशी बोलत असताना खडसे यांनी वरील उद्गार काढले. माजी मं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला ठाकूक आहे. मंगळवारी गिरीश महाजन यांनी खडसे यांना डिवचलं होतं. ईडीची तारीख आली की खडसे यांना कोरोना होतो, अशी बोजरी टीका महाजनांनी केल्यानंतर राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर खडसे म्हणाले की, कोरोनामुळे मी 20 दिवस बॉम्बे हॉस्पिटरमध्ये उपचार घेत होतो. मला अशा स्वरुपाची नौटंकी जमत नाही, असे खडसे म्हणाले. जळगाव महापालिकेत मिळालेल्या अपयशाची आठवण करून देताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जळगावची महानगरपालिका गिरीश महाजन यांच्या हातातून गेल्यामुळे त्यांना चांगलाच झटका बसला आहे. कदाचित त्यामुळे त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.

हे देखील वाचा : कोरोना झाला मात्र ईडीच्या तारखा पाहून नव्हे !


कॉपी करू नका.