लाचखोर लिपिकाला दोन वर्ष शिक्षा


जळगाव : जळगाव शहरातील शनिपेठ हद्दीतील गणेश चौधरी यांच्या नावे असलेली बिल्डिंग तक्रारदाराच्या नावे लावण्यासाठी नगर भूमापन कार्यालयातील लिपिक फेगडे याने 17 सप्टेंबर 2013 रोजी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली होती. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होऊन न्यायाधीश आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने त्यास दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.भारती खडसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.


कॉपी करू नका.