धक्कादायक ! : सरकारी वकीलही अडकले लाचेच्या जाळ्यात


वरणगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीला जामीन न मिळू न देण्यासाठी मागितली पाच हजारांची लाच

जळगाव : चक्क सरकारी वकीलानेच आरोपीला जामीन न मिळू न देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला असून नाशिक एसीबीच्या पथकाने आरोपी वकीलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता राजेश साहेबराव गवई (50) असे अटकेतील आरोपीचे नाव आहेत. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

सरकारी वकीलांनीच मागितली लाच
रेल्वेच्या एका विभागात अधिकारी असलेल्या तक्रारदाराकडे सरकारी वकील अ‍ॅड.राजेश गवई यांनी वरणगाव पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यात आरोपींना जामीनास विरोध करावा व तो मिळू नये याकरता तसेच सरकार तर्फे बाजू मांडण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 9 एप्रिल रोजी लाच मागितली होती व ही लाच जळगाव येथील तापी पाटबंधारे कार्यालया समोरील रस्त्यावर स्वीकारल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही.पाटील, प्रकाश महाजन आदींनी यशस्वी केला.


कॉपी करू नका.