भुसावळात केंद्रीय समितीकडून पाहणी : उपाययोजनांचे निर्देश


ग्रामीण रुग्णालयासह वरणगाव लसीकरण केद्रांचीही केली पाहणी

कोवीड हॉस्पीटलमधील प्रत्येक डॉक्टर, कर्मचार्‍यांनी कीटचा वापर करा
केद्रीय समिती सदस्यांच्या ग्रामीण रूग्णालयात अधिकार्‍यांना सूचना

भुसावळ : जिल्ह्यातील कोरोना विस्फोटाच्या पार्श्‍चभूमीवर भुसावळात केंद्रीय पथकाने भेट देत भुसावळातील ट्रामा, ग्रामीण रुग्णालयात भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली तसेच प्रसंगी ारोग्य विभागाचा स्टॉफ वाढविण्याच्या सूचना पथकातील अधिकार्‍यांनी केल्यात. कोवीड हॉस्पीटलमध्ये रूग्णांची तपासणी करतांना अथवा वॉर्डात जातांना डॉक्टरांनी पीपीइॅ कीट वापरूनच आत प्रवेश करण्यासह कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना न सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या.

या अधिकार्‍यांचा समावेश
समितीसोबत प्रांतांधिकारी रामसिगं सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार, अतिरीक्त आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. मयूर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. बी.एच. चाकूरकर, डॉ. कीर्ती फलटणकर, डॉ. शुभांगी फेगडे आदी उपस्थित होते.

कंटेनमेन्ट झोनला दिली भेट
केंद्रीय पथकातील डॅा. अनुपमा बेहरा व डॉ. श्रीकांत श्रीनिवासन यांनी ग्रामीण रुग्णालयाची पहाणी केल्यावर खडका रोडवरील कंन्टेनमेंट झोनची पहाणी केली. त्या परीसरातील पाहणी केली. कंटेनमेंट झोनमध्ये कोणालाही आत सोडू नका, अश्या सूचना केल्यात. ग्रामीण रुग्णालयात जर कोणी अपंग रूग्ण असेल तरच त्यांच्या नातेवाईकांना आत सोडा, अन्यथा अत्यंत महत्वाचे काम असल्यारच अन्य रूग्णांच नातेवाईकांना आत सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या.

बायावेस्ट बाहेर न पडण्याच्या सूचना
कुठल्याही परीरस्थितीत बायोवेस्ट कुठेही पडायला नको, अश्या सूचना पथकाने या प्रसंगी प्रसंगी दिल्या. पथक येण्याच्या अनुषंगाने कर्मचारी व अधिकारी मोठय संख्येने उपस्थित होते. पथकातील सदस्यांनी ग्रामीण रूग्णालयातील बायोवेस्टची पहाणी करून बायोवेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्यात.


कॉपी करू नका.