यावलमधील बेवारस वाहनांचा होणार लिलाव


यावल : यावल पोलिसांनी विविध अपघात किंवा इतर गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी मोटर वाहनांचा बेवारस असलेल्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने येत्या पाच दिवसात शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली आहे. यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रा मागील काही वर्षात घडलेले गुन्हे घात अपघात या विविध प्रकारच्या कार्यवाहीत पोलीसांनी जप्त केलेल्या किंवा हस्तगत केलेले वाहन पोलीसांनी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहकार्यातुन प्राप्त झालेल्पा दुचाकी मोटर वाहनांच्या चेचीस क्रमांकाचा आधार घेवुन वाहनमालकांचा शोध घेतले असता ते अद्याप तरी मिळुन आलेले नसल्याने सदर पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक दिवसांपासुन पडुन असलेले दुचाकी मोटर वाहन हे खराब स्थितीत आहे. यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडुन वाहनांचे मुल्यांकन अनुसार येत्या चार ते पाच दिवसात या दुचाकी वाहनांचा शासकीय प्रक्रीयेनुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली आहे.

वाहनांची ओळख पटवण्याचे आवाहन
येत्या दोन दिवसात संबधीत नागरीकांना वाहनांची ओळख पटविण्याचे अखेरचे आवाहन करण्यात येत आहे . संबंधित व्यक्तिने आपल्या आधार कार्ड सहीत आवश्यक ती वाहनाशी संबधीत कागदपत्रे घेवुन पोलीस स्टेशनला दोन दिवसात हजर व्हावे , असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे. बेवारस स्थितीत असलेल्या दुचाकी वाहनांचा अखेर लिलाव करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.