जळगावात सरकारी वकीलांना लाच भोवली : दुसर्‍या दिवशी जामिनावर सुटका


वरणगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीला जामीन न मिळू न देण्यासाठी मागितली पाच हजारांची लाच

भुसावळ : चक्क सरकारी वकीलानेच आरोपीला जामीन न मिळू न देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला असून नाशिक एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा आरोपी वकीलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता राजेश साहेबराव गवई (50) असे अटकेतील आरोपीचे नाव आहेत. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा झालेल्या कारवाईप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वकीला शनिवारी जळगाव न्यायालयात न्या.कटारीया यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली तर नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

सरकारी वकीलांनीच मागितली लाच
दर्यापूर येथील संजय खन्ना यांनी भुसावळातील राजू सूर्यवंशी व त्यांचे बंधू आनंदा सूर्यवंशी यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल केला असून तो वरणगाव पोलिसात ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात संशयीत अटकेत आहेत. आरोपींचा जामीन मंजूर न होण्यासाठी संशयीत राजेश गवई यांनी दोन क्रमांकावरून दहा हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यांनी एसीबीला प्रतिज्ञापत्र बनवून दिल्यानंतर व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवून शुक्रवारी सापळा रचण्यात आला. अ‍ॅड.गवई यांनी पाच हजारांची लाच स्वीकारताच त्यांना नाशिकच्या पथकाने रात्रीअटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही.पाटील, प्रकाश महाजन आदींनी यशस्वी केला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालल्यानंतर आरोपीचा जळगाव एसीबीच्या पथकाने ताबा घेतला. शनिवारी आरोपी अ‍ॅड.गवई यांना जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली व नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.


कॉपी करू नका.