अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या इशार्‍याने खळबळ


मुंबई : रेमडेसिवीर निर्मिती करणार्‍या कंपन्यांना महाराष्ट्र शासनानं सांगूनही औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्रानं यासंबंधीचे निर्देश दिले असून, महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तत्काळ कारवाई करू, असा इशारा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परीषदेत दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. आता फतवा काढा, ज्यांना मृत्यू कोरोनामुळं होतोय त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यास उद्यापासून सुरुवात करा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवाब मलिक यांनी जोरदार टोला लगावला. देशातील आरोग्यमंत्री बेजबाबदारपणे काम करत असून, मोदींचं याकडे लक्ष नाही. पण, वेळ अजूनही गेलेली नाही, पंतप्रधानांनी यात लक्ष द्यावं. सध्याच्या घडीला होणार्‍या रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावर लक्ष द्या, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरही लक्ष द्या म्हणत त्यांनी केंद्र शासनाला सतर्कही केलं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !