भाजपा आमदारांची नाराजी टाळण्यासाठी फडवीसांचा सत्ता येणार असल्याचा दावा
जळगावात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची विरोधी पक्ष नेत्यांवर टिका
जळगाव : माजी महसूलमंत्री यांनी पुन्हा एका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. शिवाय वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. ते ब्राह्मण असल्याने त्यांचं भाकीत खरे ठरेल, असं मला वाटत होतं मात्र त्यांचं कोणतही भाकीत खरं ठरलेले नाही शिवाय देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत तसेच भाजपमध्ये अनेक आमदार नाराज आहे, त्यांची नाराजी कमी करण्यासाठी पुन्हा आपलं सरकार येणार असल्याचा आशावाद फडणवीस त्यांच्या आमदारांना देत आहेत मात्र हे सरकार पडणार नाही, असा टोला खडसे यांनी लगावल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला त्यांनी भेट दिली तसेच पत्रकारांशी संवाद साधला.
खडसे म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांना रात्री पडतात स्वप्न
आपल्या आक्रमक शैलीत खडसेंनी फडणवीसांवर निशाणा साधला व ते म्हणाले की, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटत फडणवीस यांना रात्री-बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा केवळ केंद्र सरकारच्या धोरणामुळे होत असल्याचेही ते म्हणाले.


