तर ‘दूध का दूध पानी का पाणी केले असते’ : अ‍ॅड.रोहिणी खडसे


जळगाव : माजी महमूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंंद्र फडणवीस यांच्यावर टिका केल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी माजी मंत्री खडसेंवर भ्रष्टाचारांचे आरोप केले होते. या आरोपांचा समाचार घेताना जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनीदेखील ट्वीट करीत जर भोसरी प्रकरणात दोषी होते तर चौकशी समितीचा अहवाल विधीमंडळात का मांडला नाही? दूध का दूध पानी का पानी केले असते” असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. यानंतरही सातपुते यांनी दुसर्‍यांदा ट्टीटमध्ये भोसरी जमीन घोटाळ्यामुळे ‘ताई मंत्रीपद गेले ना हो नाथाभाऊंच’ या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा, असे म्हटले होते आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगर च्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी” ..! असा इशाराही सातपुते यांनी खडसे यांना दिला होता.

अ‍ॅड.रोहिणी खडसे रणांगणात
राम सातपुते यांच्या आरोपानंतर रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत “अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? अशी घणाघाती टिका केल्याने खळबळ उडाली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !