राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन : उद्या मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय


मुंबई : राज्य मंत्री मंडळाची प्रदीर्घ बैठक मंगळवारी झाल्यानंतर त्यात कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर पुढील 15 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागण्याचा निर्णय होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देणार आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील परीस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगत लॉकडाऊन शिवाय पर्याय उरला नाही. उद्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत घोषणा करतील, असे म्हटले आहे.

उद्यापासून निर्णय :-एकनाथ शिंदे
राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत असल्याने संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि उद्यापासून हा निर्णय लागू करतील’, असे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनीदेखील परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल, असे म्हटले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !