लॉकडाऊनचे नियम आता आणखी कडक ! : लोकल, मेट्रो व मोनो सर्वसामान्यांसाठी बंद : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीसाठी नियमावली
मुंबई : लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले असून राज्यात बुधवारपासून सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी नियमावली जारी करण्यात आली. त्यानुसार, लोकल, मोनो आणि मेट्रोमधून सर्वसामान्य नागरीकांना प्रवास बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या नवीन निमयावलीनुसार 22 एप्रिल 2021 रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत ही नियमावली लागू असणार आहे. सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के कर्मचार्यांनी हजर रहावे, ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा लागणार आहे. सार्वजनिक वाहतूकही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, खासगी बस सेवांना केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच किंवा मेडिकल सुविधेसाठी वापरण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.
एस.टी.बसेस मात्र सुरू
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली असून बसमध्येही 50 टक्क्यांपेक्षा प्रवाशांना बसमध्ये प्रवास करता येईल. दूरच्या प्रवासावरुन येणार्या नागरिकांना 14 दिवसांचं होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.
लग्न समारंभात केवळ 25 लोकांना परवानगी असेल शिवाय एका हॉलमध्ये हा सोहळा पार पाडता येईल शिवाय नियमांचे उल्लंघण केल्यास 50 हजार दंड होईल.


