अदर पूनावालांना धमकी देणर्यांची नावे समोरे यावीत : जितेंद्र आव्हाड
मुंबई : सिरम इंडियाचे अदर पुनावालांना मिळालेल्या धमकीने देशाचे नाक कापले गेल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आव्हाड म्हणाले की, सिरम इंडियाचे अदर पुनावाला यांनी ब्रिटनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आम्हालाच सर्वात अगोदर लस मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसात त्यांना देशातल्या पॉवरफुल लोकांचे सतत फोन येत असल्याचे सांगितले असून यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असून अनेक उद्योग समूहांचे प्रमुख आहेत आणि इतर श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे असल्याचे सांगितल्याने आता धमकी देणार्यांची नावे समोर यावेत, असे राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण विभागाचे कॅबीनेट मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. धमकीमुळे अदर पुनाला ब्रिटनला निघून गेले आहेत. धमकी कोणी का आणि कशी दिली हे सर्व समोर यायला हवे, असेही ते म्हणाले. अनेक जणांचे स्वार्थ यात असल्याचेही आव्हाड म्हणाले.

