‘पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना महसूलमंत्र्यांचे पत्र


मुंबई : राज्यातील पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असल्याने त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असल्याने सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. पत्रकार सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असल्याने त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आसून त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका असल्याचे पत्रात म्हटले आहे. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यातील सरकारने याबाबत निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांनीही दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !