हाजी गफ्फार मलिक यांचे निधन


जळगाव : राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने  निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सामाजिक, राजकीय व अन्य विविध क्षेत्रा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

गफ्फार मलिक यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी : जितेंद्र आव्हाड

शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी २०१४ साली यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली मात्र ते पराभूत झाले होते. तालिम-ए-अंजुमन मुसलमीन या शैक्षणिक संस्थेचे प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषविणार्‍या गफ्फार मलिक यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिवपदही त्यांनी समर्थपणे भूषविले होते. या शिक्षण संस्थेचा आता वटवृक्ष झाला असून या वाटचालीत त्यांनी घेतलेले अविश्रांत परीश्रम कारणीभूत आहेत.

अल्पशा आजाराने निधन
दरम्यान, मलिक यांना अल्पशा आजाराने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांना मलिक यांनी शेवटचा श्‍वास घेतला. रात्री साधारणत: साडेदहाच्या सुमारास हाजी साहेबांच्या निधनाची वार्ता येताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवार 25 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !