गफ्फार मलिक यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी : जितेंद्र आव्हाड
जळगाव : गफ्फार मलिक यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे. पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या या नेत्याच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे, अशी भावना मलिक यांच्या निधनानंतर गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

