भुसावळकरांना दिलासा : यावल रस्त्यावरील खड्डे बुजवले
भुसावळ- खड्ड्यांमुळे जर्जर झालेल्या भुसावळकरांना काहीसा दिलासा मिळाला असून यावल रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवण्यात आल्याने समाधा न व्यक्त होत आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीपूर्वीच या रस्त्यांवर मुरुम टाकण्यात आला मात्र पावसानंतर तो वाहिला. यानंतर आता यावलरोडची सोमवारपासून पुन्हा डागडुजी सुरू करण्यात आली. डांबरीकरणाने खड्डे बुजवले जात असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
अमृत योजनेमुळे रस्त्यांची लागली वाट
अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण होईल मात्र या दरम्यान खड्ड्यांमुळे नागरीकांना त्रास होणार आहे. यावलरोडची सर्वाधिक दुर्दशा झाल्याने या रस्त्यावरील खड्डे सोमवारी खडी व डांबराने बुजवण्यात आले त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपासून कडक ऊन पडल्याने मुरुमाची धुळ उडून वाहनधारक व पादचार्यांना त्रास सहन करावा लागत होता मात्र आता पावसाची उघडीप मिळाल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून बुजवले जात असल्याने समाधान यक्त होत आहे.