भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे 27 रोजी राष्ट्रीय परीषद
राज्यभरातील 179 संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग : 87 शोधनिबंधाचे होणार वाचन
भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे ‘रसायनशास्त्रातील बदलते परीमाणे’ (सीपीसीएस 2019) या विषयावर राष्ट्रीय परीषदेचे 27 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता महाविद्यालयातील परीषद हॉलमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक अध्यक्षस्थानी असतील.
यांची राहणार उपस्थिती
परीषदेच्या उद्घाटन समारंभास ताप्तीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या परीषदेत रसायनशास्त्रातील सिद्धांतीक व गणकीय रसायनशास्त्र, रासायनिक अभिक्रिया, जैविक उत्पादकता, हरीत रसायनशास्त्र, पर्यावरण रसायनशास्त्र, पॉलीमर रसायनशास्त्र आदी रसायनशास्त्रातील वेगवेगळ्या विषयांचा परिषदेत संशोधक व विद्यार्थी अभ्यास करणार आहे. या परीषदेसाठी भोपाळ, पुणे, मुंबई, गुजरात, कानपूर, बंगलोर, केरळ या बरोबरच महाराष्ट्रातील असंख्य विद्यापीठातील सुमारे 179 संशोधक व विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. हे सर्व संशोधक व विद्यार्थी रसायनशास्त्रातील विविध उपविषयांचा पॉवरपॉइन्ट प्रेझेन्टेशन, पोस्टर प्रेझेन्टेशन, चर्चासत्र इ. शैक्षणिक उपकरणांचा आधार घेऊन आपापल्या विषयांचा अभ्यास करणार आहेत.
87 संशोधक शोधनिबंधाचे वाचन
या परीषदेत संशोधक व विद्यार्थ्यांपैकी सुमारे 87 संशोधक आपापल्या शोधनिबंधांचे वाचन करतील. यावेळी रसायनशास्त्रातील दिग्गज व अभ्यासू प्रोफेसर्स, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ अनुक्रमे प्रा.डॉ.संजय वाटेगावकर (टी. आय. एफ. आर, मुंबई, डॉ.नीतीन पाटील (आयआयएसईआर, भोपाळ), प्रा.डॉ. सत्येंद्र मिश्रा (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांची उपस्थिती लाभणार आहे. या परीषदेत प्रथमच संशोधन प्रबंध तसेच पेपरचे लिखाण करण्याबाबत समितीच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चर्चासत्र होईल. या चर्चासत्रामुळे प्रबंध लिहिण्याबाबतची माहिती त्याबाबत येणार्या अडीअडचणी याबाबतचे भेडसावणारे प्रश्न याबाबत विद्यार्थी व प्राध्यापक समितीच्या सदस्यांना विचारतील. या चर्चासत्रामध्ये इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे काय? तसेच यु.जी.सी.ने दिलेल्या नवीन व मान्यता दिलेली जरनल्सच्या यादीबद्दल माहिती दिली जाईल. दुपारी चार वाजता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांच्या अध्यक्षतेखाली परीषदेचा समारोप होईल.
यांचे परीषदेसाठी परीश्रम
संपूर्ण परीषद उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.ए.डी. गोस्वामी, प्रा.एन.ई.भंगाळे, प्रा.ई.जी.नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली परीषदेचे समन्वयक डॉ.सचिन येवले, परीषदेचे सचिव डॉ.विलास महिरे, प्रा.दीपक पाटील, परीषदेचे कोषाध्यक्ष प्रा.चंद्रकांत सरोदे, प्रा.प्रशांत पाटील, प्रा. नीलिमा पाटील, डॉ.उमेश फेगडे, प्रा.सचिन कोलते, प्रा.संगीता भिरूड, प्रा.तेजश्री झोपे, प्रा.डॉ.अजय क्षिरसागर, प्रा.योगीता पाटील, प्रा.जागृती नेहेते, प्रा. शंकर पाटील, अमोल कोळी, प्रा.हर्षल पाटील परीश्रम घेत असल्याचे परीषद प्रसिद्धी समिती प्रमुख प्रा.प्रशांत पाटील कळवतात.