केळी पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ विमा योजनेचा लाभ मिळावा


खासदार रक्षाताई खडसे : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

जळगाव : जोरदार पाऊस व वादळामुळे रावेरसर मुक्ताईनगर केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात-लवकर नुकसान भरपाई मिळणे तसेच मागील वर्षीच्या हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजनेतील जवळपास तीन हजार शेतकर्‍यांना एकवर्ष उलटून सुद्धा पिक विम्याचा लाभ मिळालेला नाही तरी त्यांना तांत्रिक त्रुटी दूर करून तत्काळ लाभ मिळावा, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

त्या केळी खोडांचाही व्हावा पंचनामा
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, विमा कंपनीकडून केळी नुकसानीचे पंचनामे करतांना नुकसान कमी झाल्याचे दाखविण्यात येत आहे. पूर्णतः नुकसान झालेल्या केळी खोडांचेच नुकसान दाखविण्यात येत आहे परंतु ज्या केळीच्या खोडांना पाऊस व वादळाचा फटका बसलेला आहे परंतु ते उभे आहे अशा केळी खोडांपासून शेतकर्‍यांना कुठलाही फायदा नसून ते सुद्धा शेतकरी काढून टाकणार आहे अशा नुकसानीची सुद्धा दखल घ्यावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसेंनी केली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृ.उ.स.अनिल भोकरे, राहुल पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अरुण प्रकाश, तालुका कृषी अधिकारी रावेर एम.जी.भामरे, यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, चोपडा तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, विमा कंपनी बजाज अलियान्स प्रतिनिधी कविश उमक, देविदास कोळी, समाधान अरुण पाटील, बँक ऑफ बडोदा सावदा, आयसीआयसीआय बँक जळगांव, मुक्ताईनगर, फैजपूर, खामगांव ई. बँक शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !