नशिराबाद खुनाने हादरले : कौटूंबिक वादातून पत्नीला संपवले, आरोपी जाळ्यात


गणेश वाघ
Nashirabad Shaken by Murder: Wife Killed Amidst Family Dispute; Accused Apprehended भुसावळ (22 जून 2026) : कुटूंबात सातत्याने होणार्‍या कलहातून संतप्त पतीने पत्नीची कोयत्याचे वार करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद येथे सोमवार, 22 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने नशिराबाद परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंदा विकास जाधव (28) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर संशयीत विकास जाधव (32) या पतीस नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय घडले नशिराबाद गावात ?
नशिराबाद गावातील भवानी नगरात जाधव दाम्पत्य वास्तव्याला होते मात्र दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून कुठल्या ना कुठल्या कारणातून वाद सुरू होते. सोमवार, 22 रोजी दुपारी एक ते दिड वाजेदरम्यान दाम्पत्यात वाद झाल्याने संतप्त पतीने घरातील कोयत्याने पत्नीवर सपासप वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली व गतप्राण झाली. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली.

यंत्रणेची घटनास्थळी धाव
भुसावळ विभागाचे उपअधीक्षक केदार बारबोले यांच्यासह नशिराबाद प्रभारी योगिता नारखेडे यांच्यासह सहकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली. यावेळी संशयीत आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले. जळगाव येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम पाचारण करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !