सत्यतेवर आधारीत संशोधन समाजोपयोगी असावे


प्र.कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर : भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय परीषद

भुसावळ : राष्ट्रीय परीषदांमुळे संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची चालना मिळते तसेच संशोधन हे पूर्णतः सत्यतेवर आधारीत व समाजोपयोगी असावे जेणेकरून अशा संशोधनाचा लाभ भावी येणार्‍या पिढ्यांना घेता येईल. आजकालच्या संशोधनात काही ठिकाणी सत्यता कमी आढळते ही चिंतेची बाब आहे म्हणूनच जास्तीत-जास्त चांगले संशोधन होण्यासाठी अशा परीषदा प्रेरणादायी ठरतात व आपल्या करीयरमध्ये परीषदांचे महत्त्वाचे योगदान असते व देशाकरीता व समाजाच्या जडणघडणीत परीषदांचे मोलाचे स्थान असल्याचे विचार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे (सीपीसीएस 2019) राष्ट्रीय परीषदेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी डॉ.माहुलीकर बोलत होते.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहनभाऊ फालक होते. ताप्तीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, माजी प्राचार्य डॉ.व्ही.सी.कोल्हे, प्रा. डॉ.संजय वाटेगावकर, डॉ.नीतीन पाटील, विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, परीषदेचे समन्वयक डॉ.सचिन येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्या-परराज्यातील 210 संशोधकांचा सहभाग
परीषदेत रसायन शास्त्रातील सिद्धांतीक व गणकीय रसायनशास्त्र, रासायनिक अभिक्रिया, जैविक उत्पादकता, हरीत रसायनशास्त्र, पर्यावरण रसायनशास्त्र, पॉलीमर रसायनशास्त्र इ. रसायनशास्त्रातील वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास केला गेला. या परीषदेत संशोधक व विद्यार्थी मिळून 210 संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला,. हे सर्व संशोधक भोपाळ, पुणे, मुंबई, गुजरात, कानपूर, बंगलोर, केरळ या बरोबरच महाराष्ट्रातील असंख्य विद्यापीठातून आले.

आव्हानात्मक कामाचा अभिमान -डॉ.फालक
डॉ.मोहन फालक म्हणाले की, एखादी परीषद घेऊन ती यशस्वी करणे फार कठीण काम असते आणि असे कठीण व आव्हानात्मक काम आपल्या महाविद्यालयात होते याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. द्वितीय सत्रात प्रा.डॉ.संजय वाटेगावकर यांनी आधुनिक स्पेक्टरोस्कोपी टू अनरायव्हल वीक इंटरऍक्शन याविषयावर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.व्ही.सी.कोल्हे हे होते. तृतीय सत्रात प्रा.डॉ. नितीन पाटील यांनी सर्चिंग फॉर न्यू रीऍक्टिव्हिटीस थ्रू गोल्ड अँड चीरल ब्रॉन्स्टट ऍसिड कॅटॅलिसीस या विषयावर मार्गदर्शन केले.

96 संशोधकांनी केला अभ्यास
चौथ्या सत्रात प्रा.सत्येंद्र मिश्रा यांनी इफेक्ट ऑफ ग्राफीन बेस्ड मटेरीअल्स ऑन व्हेरियस प्रॉपर्टीस ऑफ इट्स पॉलिमरनॅनोकॉम्पोझिट्स या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.नितीन पाटील होते. पाचव्या सत्रात एथिक्स ऑफ रिसर्च पब्लिकेशन या विषयावर प्रा.डॉ.संजय वाटेगावकर, डॉ. नितीन पाटील, प्रा.सत्येंद्र मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. सहाव्या सत्रात पोस्टरच्या सादरिकरणातून 96 संशोधकांनी रसायनशास्त्रातील संशोधनाचा अभ्यास केला. तीन पोस्टरला शिक्षक व प्राध्यापक अश्या वेगवेगळ्या गटातून पारीतोषिके देऊन गौरवण्यात आले


कॉपी करू नका.