श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत विविध स्पर्धांचे आयोजन


भुसावळ- शहरातील झेडटीआरआय भागातील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात केंद्रीय योजनेंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत सोलर सिस्टम, मेकॅनिकल, आर.ओ.प्लंम्बिंग, सीसी कॅमेरा आदी अभ्यासक्रमे मोफत शिकविले जातात. कौशल्य आठवड्यानिमित्त विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा, पोस्टर पेंन्टींग स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच युवा संवाद साधधण्यात आला. प्रसंगी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा मान्यवरांनी केला गौरव
शुभम गोरार, मोहित पाटील, नदीम पटेल, कौस्तुभ दुसाने, नुतन बनसोड व जैनुर खान या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. हा अभ्यासक्रम पुर्ण मोफत असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे रहाता येते व उद्योगही सुरु करता येतो.शिवाय नोकरीची शंभर टक्के हमी आहे. या विद्यार्थ्यांना सर्व राष्ट्रीय बँकामधून अल्प दरात प्राधान्याने कर्ज सुविधा उपलब्ध असल्याचे केंद्र प्रमुख वासुदेव साधु यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक योगेश धीमान, प्रशासक केदारसिंग चौधरी, विक्रम कोल्हे, अक्सा शेख आदींनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.