चाळीसगावात मातृभूमीला वंदन करीत भाजपा उमेदवार मंगेश चव्हाणांनी भरला अर्ज

चाळीसगाव : चाळीसगावातील भाजपा, शिवसेना, रिपाई, रयत क्रांती सेना युतीचे तरुण, तडफदार उमेदवार मंगेश चव्हाण यांनी शुक्रवारी मातृभूमीला नतमस्तक होत वंदन करीत आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी कार्यकर्त्यांसह चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांचा उत्साह वाढवला. हजारो कार्यकर्त्यांनी मंगेश चव्हाण यांचा उत्साह वाढवून मंगेश दादा आगे बढोच्या घोषणा दिल्या. तहसील कार्यालयात प्रांताधिकारी शशिकांत सातळरकर यांच्याकडे दाखल केला.
शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला अर्जा
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच सीताराम पैलवान यांच्या मळ्यातील त्यांच्या पेंडलमध्ये समर्थकांची प्रचंड गर्दी केली होती. पक्ष पदाधिकार्यांनी जनसमुदायाला संबोधित केल्यानंतर उघड्या जीपवर संपूर्ण शहरभर मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

यांचा मिरवणुकीत सहभाग
यावेळी भाजपाचे जिल्हाप्रमुख डॉ.संजीव पाटील, माजी खासदार तथा माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, राजेंद्र वाडीलाल राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय राजपूत, सोमसिंग राजपूत, चंदू तायडे, चिराग शेख, बाप्पू अहिरे, प्रभाकर चौधरी, मानसिंग राजपूत, निलेश राजपूत, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, पं.स.सभापती स्मितल बोरसे, दिनेश बोरसे, दड पिंपरीचे माजी सरपंच नाना पवार, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, जि.प.सदस्य पोपटतात्या भोळे, शेषराव पाटील, भास्कर पाटील, भुषण पाटील, खुशाल पाटील, जितेंद्र वाघ आदींसह पाच हजारांवर समर्थक उपस्थित होते.
