भुसावळला अखेरच्या दिवसापर्यंत 22 उमेदवारांचे 36 अर्ज दाखल


भुसावळ : भुसावळ विधानसभा मतदार संघातून अखेरच्या दिवसापर्यंत 22 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल केले. यात विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी शक्तीप्रदर्शन करीत शुक्रवारी पुन्हा उमेदवारी दाखल केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सुनील सुरवाडे यांनीही शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारीचा अर्ज सादर केला. भुसावळ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 22 उमेदवारांनी एकूण 36 अजर्र् दाखल केले आहेत.

यांनी दाखल केले अर्ज
भाजप व मित्र पक्षाचे विद्यमान आमदार संजय सावकारे, राष्ट्रवादी, काँग्रेस व पीआरपी मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून जगन सोनवणे, निलेश सुरळकर (मनसे), सुनील सुरवाडे (वंचित बहुजन आघाडी), रवींद्र सपकाळे (एमआयएम) यांच्यासह रजनी सावकारे, सतीष घुले, कैलास घुले, पुष्पा जगन सोनवणे, डॉ.मधू मानवतकर, यमुनाबाई रोटे, निलेश देवघाटोळे, राकेश वाकडे, संजय ब्राम्हणे, गीता खाचणे, जानकीराम सपकाळे, राजेंद्र केशव सपकाळे, प्रतिभा सुरवाडे, विष्णू नेमीचंद खोले, जे.पी.सपकाळे आदींनी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. तहसीलदार दीपक धीवरे यांची उपस्थिती होती.









मोजक्याच पदाधिकार्‍यांना प्रवेश
प्रवेशद्वाराजवळ व तहसील कार्यालयात पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह पोलीस बांधवानी चोख बंदोबस्त ठेवला. प्रवेशद्वारातून उमेदवारांच्या केवळ मोजक्याच पदाधिकार्‍यांना प्रवेश देण्यात आला तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनातही केवळ पाच व्यक्तींना प्रवेश देण्यात आल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रकीया सुरळीत पार पडली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !