जळगाव ऑईल मिलमधील आगीवर नियंत्रण : लाखोंचे नुकसान


जळगाव : औद्योगिक वसाहत परीसरातील जगवाणी ऑईल मिलला शुक्रवारी रात्री 11 वाजता भीषण आग लागून लाखो रुपयांचे खोबरे, तेल, तूप तसेच सरकी ढेप जळून खाक झाले. आरटीओ कार्यालय परीसरातील रहिवासी हरिष जगवाणी यांच्या मालकीची औद्यागिक वसाहत परिसरातील बी-11 मध्ये जगवाणी ऑईल मिल असून शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मिलच्या मागील बाजूने धूर निघत होता. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षारक्षकाने लहान बॉयलर बंद केले. मात्र, रात्री 11 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे मिलमध्ये ठेवलेल्या खोबरे व सरकी ढेपला आग लावताच धावपळ सुरू झाली. जैन कंपनीसह मनापा व अन्य ठिकाणच्या आलेल्या बंबांच्या मदतीने मदतीने पाण्याचा मारा केल्यानंतर मध्यरात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

एमआयडीसी पोलिसांची धाव
आगीची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक तसेच सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल पाटील, सचिन पाटील, मुदस्सर काझी, हेमंत काळसकर यांच्यासह पोलिसांच्या ताफ्याने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली़ कंपनीचे मालक हरीष जगवाणी सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. आगीत लाखो रुपयांचे खोबरे, खोबरे तेल, तूप तसेच सरकी ढेप जळून खाक झाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !