पाळधीनजीक प्रेमी युगुलांचे मृतदेह सापडले


घातपाताचा संशय : दुचाकी खदाणीत पडली

पाळधी : पाळधीजवळील चिमणीभट्टा परीसरातील पाण्याच्या खदानीत जयेश दत्तात्रय पाटील (18, नशिराबाद) व एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ डाली. दुचाकी घसरून दोघेही खदाणीच्या पाण्यात बुडू मृत्यू झाल्याची चर्चा असलीतरी दुसरीकडे घातपाताचाही संशय व्यक्त होत आहे. पाळधी पोलीस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल.

आधी तरुण बेपत्ता , नंतर सापडला मृतदेह
नशिराबाद यथील रहिवासी जयेश पाटील हा पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असताना पाळधीतील एका तरुणीशी त्याचा परीचय झाला. बुधवारी जयेश हा कुटूंबीयांना काही न सांगता घरातून निघाला मात्र मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीय व मित्र मंडळी त्याचा शोध घेत असताना गावातील तरुणीही बुधवारी एका क्लासला गेली मात्र तीही न परतल्याने तिचा शोध सुरू असताना गुरूवारी तरुणी हरवल्याची पाळधी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली. शुक्रवारी
सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाळधी गावापासून एक ते दीड किलो मीटर अंतरावर चांदसर रस्त्यावरील एका खदानीतील पाण्यावर काही ग्रामस्थांना तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर पाळधी पोलिसांना माहिती देण्यात आली. महिला सहाय्यक फौजदार निलिमा हिवराळे, अरूण निकुंभ, सुमित पाटील, गजानन महाजन आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह काढले.









बक्यात आढळली दुचाकी
मृतदेहाजवळ दुचाकी (एम.एच. 19 डीएच 6816) आढळल्यावरून तरुणाची ओळख पटली. तरुणीचीही ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या घरी माहिती दिली. यावेळी दोघांच्या कुटूंबीयांनी व मित्र मंडळींनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर दोघांचे मृतदेह हे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. हा घातपाताचा प्रकार असल्याची शंका जयेशच्या कुटुंबीयांनी व्यक्त करण्यात आली. शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !