माजी आमदार संतोष चौधरी दोन दिवसात जाहीर करणार भूमिका !

भुसावळ : राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली जागा घटक पक्ष पीआरपीला सोडण्यात आल्याने भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे. असे असलेतरी शहर व तालुक्याच्या पटलावर आजही त्यांचे महत्व अबाधीत आहे त्यामुळे भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची भूमिका काय असणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे. चौधरी हे दोन दिवसात मोठा मेळावा घेतील व आपली भूमिका व उमेदवारही जाहीर करतील, अशी राजकीय गोटातील माहिती आहे. भुसावळ पालिकेत स्वबळावर चौधरी यांनी एकाकी झुंज देत तब्बल 19 नगरसेवकांना निवडून आणले होते त्यामुळे राष्ट्रवादीला जागा मिळाली नसलीतरी निवडणुकीत मात्र आता ते नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

