बहिणीशी संबंध असल्याच्या संशयातून मित्राचा काढला काटा : डोंगरकठोर्यातील आरोपीला अटक

यावल पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली सुरी केली जप्त : अल्पवयीन संशयीतास 11 ऑक्टोबरपर्यंत बालन्यायालयीन कोठडी
यावल : बहिणीशी संबंध आहेत का याबाबत वारंवार विचारणा केली मात्र शरीफने त्याबाबत कधीही दखल घेतली नाही त्यामुळे त्याला कायमचे संपवले, अशी कबुली डोंगरकठोर्यातील अल्पवयीन संशयीताने दिली. संशयीतास बालन्यायालयापुढे हजर केल्यानंतर त्यास 11 ऑक्टोबरपर्यंत बालन्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयीताच्या ताब्यातून यावल पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली सुरी जप्त केली आहे.
प्रेम संबंधाचा संशय असल्याने काढला काटा
डोंगरकठोरा येथील शरीफ तडवी या तरुणाचा खून झाल्याचे गुरुवारी सकाळी पोलिसांच्या निदर्शनास आले. खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या त्या अल्पवयीन मुलाने एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने या घटनेचा उलगडा करून पोलिसांना सांगितले. शरीफ तडवीचे आपल्या बहिणी सोबत प्रेमसंबंध असल्याचा मला संशय होता व मी याबाबत त्याला बोललो होतो. मात्र त्याने त्या गोष्टीला सिरीयसली घेतले नाही, उलट तो हसून मस्करी करायचा. याचाच राग माझ्या मनात आला होता. म्हणून त्याचा काटा काढण्याचा असं मी ठरवलं होते. त्याच उद्देशाने मी बुधवारी रात्री 8.30 वाजेनंतरच्या सुमारास त्याचा काटा काढला असे त्याने पोलिसांना सांगितले.