मुक्ताईनगर विधानसभेसाठी 14 उमेदवारांचे 21 अर्ज

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी 14 उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले असून उमेदवारी दाखल करणार्यांमध्ये भाजपतर्फे मुख्य उमेदवार म्हणून रोहिणी खडसे डमी उमेदवार म्हणून अशोक कांडेलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडलेला नाही दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रवींद्र भैय्या पाटील तर शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बहुजन समाज पार्टीतर्फे भगवान इंगळे, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संजय कडू इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे मुख्य उमेदवार म्हणून राहूल अशोक पाटील तसेच डमी उमेदवार म्हणून नितीन प्रल्हाद कांडेलकर, राजेंद्र दगडू सांगोलकर, संजय कांडेलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवारी दाखल करणार्यांमध्ये प्रमुख शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे विनोद तराळ, अनिल बाबुराव गंगातीरी, ज्योती महेंद्र पाटील आदी 14 उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले.

