भुसावळात रेल्वेतर्फे 16 रोजी पेन्शन अदालत

भुसावळ : सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध अडी-अडचणी सोडवण्यासाठी सोमवार, 16 रोजी पेन्शन अदालतीचे डीआरएम कार्यालयात मिटींग हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्यांनी आपल्या समस्या तीन प्रतीत वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी यांच्याकडे पाठवाव्यात. अर्ज करताना कर्मचार्याने आपले नाव, पदनाव, भरतीची तारीख, सेवानिवृत्तीची तारीख तसेच पीपीओची झेरॉक्स प्रत तसेच बँक पासबुकची झेरॉक्स प्रत गुरुवार, 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

