जळगावात दोन अपक्षांसह एमआयएम उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध


जळगाव : जळगाव विधानसभा मतदार संघात छाननीअंती दोन अपक्षांसह एका एम.आय.एम.च्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. 24 उमेदवारांनी दाखल केलेल्या 38 अर्जांपैकी तीन अर्ज अवैध ठरले. विष्णू गणपत घोडेस्वार यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी ए.बी. फॉर्म जोडलेला नाही, म्हणून अवैध ठरविण्यात आला आहेतर एमआयएमचे रेयान अब्दुल नबी जहांगीर आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले कालू तेजू कोळी यांनी अपूर्ण प्रस्तावक दिल्याने दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले. स.पा.तर्फे ए.बी. फॉर्म सादर न करू शकल्याने डॉ. राधेश्याम चौधरी यांना सायंकाळपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली असून सध्या त्यांचा तो अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज वैध ठरल्याने ते निवडणूक मैदानात कायम आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !