हैदराबाद-जयपूर विशेष गाडी धावणार

भुसावळ : दिवाळीच्या पार्श्वभुमीवर रेल्वे गाड्यांना प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून हैद्राबाद जयपूर विशेष गाडी शुक्रवार, 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही गाडी हैद्राबाद येथून शुक्रवारी दुपारी 4.20 वाजता सुटून रविवारी पहाटे तीनला पोचणार आहे. परतीच्या प्रवासात डाऊन जयपूर हैद्राबाद ही विशेष गाडी दर रविवार, 6 रोजी दुपारी तीनला सुटणार आहे. ही गाडी मंगळवारी पहाटे दोनला हैद्राबादला पोचले. या गाडीच्या नऊ फेर्या राहणार आहे. ही गाडी सिकंदराबाद, मेदूचल, काम रेड्डी, निजामबाद, धरमाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, बर्हाणपूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, रतलाम, मंदसोर, नीमच, चितोढगड, चंदेरिया, भिल्वारा, अजमेर, फुलेरा येथे थांबणार आहे, ही गाडी भुसावळ स्थानकावर न येता कॉड लाईनीवरून झेडटीसीकडून परस्पर जाणार आहे.

